ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 13, 2016, 10:15:32 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

जनता तिथे जागृत असते
क्रांतीला वेळ लागत नाही
आपली जनता झोपलेली
ती उठायला तयार नाही,!

स्वातंत्र्यापासुन माती ही
अरे हररोज रडत आली
अन्यायाविरोधात लढाया
जनता एकजूट कधी झाली,?

एक जेव्हा विरोध करतो
दुसरा तेव्हा पाहत असतो
अन्यायाच्या वस्तीमधील
आपलेच घर राखत असतो,!

मग म्हणते इथली जनता
आमच्या हातात काय आहे
संविधानाची ताकद समजा
कळेल जनतेत काय आहे,?

जातीधर्माच्या गोधडीत
आपण मस्त झोपले आहोत
सर्व काही आपले असता
आपण हक्क विचारत आहोत,!

ललित कुमार
wapp-7744881103
-----------------------------