तु आहेस...

Started by गणेश म. तायडे, May 13, 2016, 04:53:02 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

आसरा जो तुझ्या
हृदयातील स्पंदनात आहे
धडधड उरातील माझ्या
तुझ्या डोळ्यात दिसत आहे...
तुच आहेस जो मज
स्वप़्न पाहणे शिकवून गेला
तुच आहेस जो मज
रडताना हसवून गेला...
अंत प्रेमाचा तु आहेस
जिवनातला साथी तु आहेस
तु आहेस तर मी आहे
आनंद जगण्याचा कारण तु आहेस...
मग का वळावे त्या रस्त्यावरून
जो तुझ्या जवळ घेऊन जात आहे
का घाबरावे त्या विरहास मी
ज्याच्या शेवटी तु उभा आहेस...

- गणेश म. तायडे,
   खामगांव
    ganesh.tayade1111@gmail.com