एक रुतालाच काटा

Started by विक्रांत, May 13, 2016, 06:42:35 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

किती ओबडधोबड
वाटा तुझिया गावच्या
फाटे फुटतात लाख
अन चाळण्या पायांच्या 

कधी दिसल्या वाचून
हाका येतात कानात
जीव अधिरतो रोज
रोज सावल्या मनात

भय चकित आयुष्य
रोज मोजतेय क्षण
वाळू निसटून गेली
काही उरलेत कण

घट्ट लावूनी कवाडे
दूर बैसले वाटाडे
मरू पडून कडेला 
लाख विख्रुली हाडे

भाक पुढील जन्माची
ती ही बरी आहे म्हणा
आशा हीच नच जावो   
उगा केलेला कुटाना 

बघ बोलता बोलता
एक रुतालाच काटा
अहा अहा अरे दत्ता
शब्द ओठी ये विक्रांता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/