ग्रुप अँडमीन

Started by vishal maske, May 16, 2016, 09:28:34 AM

Previous topic - Next topic

vishal maske

-------- ग्रुप अॅडमीन --------

                 कवी :- विशाल मस्के, सौताडा
                 मो. 9730573783

प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे
कुणीही ग्रुप काढू शकतो
सोशियल मिडीयाने माणसं
प्रत्येकजण जोडू शकतो

ज्याच्या-त्याच्या इच्छेनुसार
ज्याचा-त्याचा वावर असतो
सोशियल मिडीयातील ग्रुप
प्रसारणाची पावर असतो

कुणासाठी कुटूंब असतो
कुणासाठी मात्र गँग असतो
अन् ग्रुपमध्ये वावरतानाही
कुणी भलताच हँग असतो

कुणाला नावडते असतात
कुणाला आवडते असतात
सोशियल मिडीयातील ग्रुप
भलतेच दवडते असतात

नको असलेल्या बाबींचाही
कधी गौप्यस्फोट होऊ शकतो
तर कधी-कधी आपलाच ग्रुप
आपल्या अंगलट येऊ शकतो

ग्रुप कसा चालवावा याचेही
ग्रुप अँडमीनला सल्ले असतात
तर ग्रुप मेंबर्स कडून कधी
अँडमीनवरतीच हल्ले असतात

कधी अनावश्यक मेसेजेसची
नको तितकी वळवळ असते
तर कधी-कधी ग्रुपमध्ये
क्रांतीवादी चळवळ असते

जरी वाढत्या समस्यांचेही
वरवर वाढते प्रहार आहेत
तरीही ग्रुप जोपासण्यासाठी
अॅडमीनलाही अधिकार आहेत

कुणाची रिमोव्हिंग असते
तर कुणाची अँडींग असते
मात्र आपल्या ग्रुप एवढीच
ग्रुप अँडमीनची डांगडींग असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील कविता अॉडीओ स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कविता आवडल्यास नाव न काढता फॉरवर्ड करू शकता,...