रात नशिली...

Started by गणेश म. तायडे, May 17, 2016, 05:35:21 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

एक रात ती नशिली होती
त्या रात्री तुझी साथ होती
क्षण सोबतीचे आठवत होते
स्वप़्नात मन बावरत होते
चोहीकडे लाल छाया पसरली
हळूच समोर एक परी उतरली
लाजत गाजत ती जवळ आली
कानात माझ्या हळूच गुणगुणली
करमेना मला तुजवाचूनी सजना
जवळ ये ना, जवळ मज घे ना
आतूरलेल्या माझीया मनाला
तुझ्या सहवासाची चाहूल दे ना
विसरूनी माझ्यात स्वतःला सजना
मज मिठीत घट्ट आवळून घे ना
प्रेम मनातील आयुष्यभराचे
माझ्यावर तु उधळून दे ना
रात नशिली तुझ्या सोबतीची
साठवूनी गेली आरास आठवणींची

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com