धग दुष्काळाची...

Started by गणेश म. तायडे, May 18, 2016, 12:08:59 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

धग पेटलेली नभात
वणवा उरी पेटला आहे
नद्या नाली कोरडी झाली
डोळ्यातील आसवे आटूनी गेली
तहान जमीनीस लागलेली
कासावीस थेंबास झाली
उडून गेली पाखरे सारी
प्राण्यांची वणवण सुरू झाली
धावनाऱ्या ढगात आता
थेंब पाण्याचा शोधू लागली
कधी शाळेत जाणारी चिमुकली
हंडा घेऊन फिरू लागली
जबाबदार कोण यांस
चुकी आपली साऱ्यांची झाली
झाडे तोडून घरं बांधली
तिच घरे आता खाऊ लागली
उठतोय जिवावर विकास आपला
करतोय आता हिसाब आपला
जागे व्हा! मायबापांनो आता
शेतकऱ्यांना बळ द्या आता
पाणी वाया न घालवता, जिरवा
झाडे लावा, झाडे जगवा
पाणी अडवा, पाणी जिरवा
मंत्र उरी आता हाच बाळगा
आयुष्यावर प्रेम करा रे
निसर्गाला स्वतंत्र करा...

- गणेश म. तायडे,
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com