तमाशा

Started by Ravi kamble, May 18, 2016, 06:24:00 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

आजहि काही ग्रामीण भागात काही
माता भगिनींना देवदासी या प्रथेचा
सामना करावा लागतो व त्यापुढेही
जाऊन काहींना मुलं हि होतात
त्यापैकी काहींच्या वाटेला आलेलं भोग
मी या कवितेद्वारे सादर करीत आहे.

!!×!!   तमाशा   !!×!!

कोवळ्याच! वयामधी
पायी! घुगंरं! वाजली!
तमाशाच्या! फडामधी
माय! बेभान नाचली!

देवदासीच्या!!  गर्भात
बिनबापाची!! वाढली
नियतीच्या!! खेळापुढं
तरी! नाही ती वाकली
सुर! लागे! लावणीचा
कधी! गौळण! रंगली
तमाशाच्या! फडामधी
माय! बेभान नाचली!

वन!! वन!! जिंदगीची
आग! पोटात! लागली
अजानत्या!! वयामधी
चोळी! अंगात घातली
लाल! गुलाल! भांगात
गंध! कपाळी! टिकली
तमाशाच्या! फडामधी
माय! बेभान नाचली!

वासनेच्या!!! नजरेला
मुभा! लाचार लाभली
बोर्डावर!! नाचताना!
माय कधी ना थांबली
पैसा! फेकून! ओटीत
गर्दि केव्हाच! पांगली
तमाशाच्या फडामधी
माय! बेभान नाचली!

देवदासीच्या!! रुढीनं
केली जन्माची शिकार
कोवळ्याच  वयामधी
जिणं! भोगलं भिकार
ईच्छा मारून जिवाची
काडी! उरात! पेटली
तमाशाच्या फडामधी
माय! बेभान नाचली!

रवींद्र कांबळे 9112143360
व्हाट्सप नं. 9970291212