प्रतिक्षा!!

Started by श्री. प्रकाश साळवी, May 18, 2016, 08:56:08 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

प्रतिक्षा
अजूनही जातो त्याच रस्त्यावरून
रस्त्यालगतच लागतं तुझं घर
आणि...नकळतच माझी नजर
वळते तिथे...त्या खिडकित
जिथे तुझे डोळे देखील
वाट पहात असतात माझी
आतुरतेने...पण !
हल्ली तूच दिसत नाहीस
त्या खिडकित!!
आणखी किती
प्रतिक्षा करायला लावणार ,
चातकासारखा वाटेकडे डोळे लाऊन बसलोय,
पावसाचा पहिला थेंब टिपण्यासाठी
आतुर, तसा तुझ्या प्रतिक्षेत
काही काम नसताना देखील
मी सहजच एक
फेरफटका मारतो
हे रोजचच झालय आता
त्याच रस्त्यावरून
तुझ्या प्रतिक्षेत !!!

प्रकाश साळवी ✍

vikas puri

i like this poem nice.........
  i also like to write poems.....

श्री. प्रकाश साळवी

Thanks for Reply and well come to write a poems sir.