कशाला?

Started by akshay nehare, May 19, 2016, 12:39:23 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

नाटकी रडू अन कोराड आणावी का घशाला..
अशीही रुसतेस सये, खोटा बहाना कशाला?

रोज झोपतानी मात्र तो चंद्र घेतीस उशाला..
हट्ट करती असा सये, चांदण्यांची साडी कशाला?

हेवे दावे करुन नको असा लटका राग उराला..
घेतो मी मिठीत सये, ये लवकर उशीर कशाला?
उशीर कशाला?

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७