सुंदरतेचा कळस

Started by kalpesh.patil, May 19, 2016, 08:10:07 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

👫 सुंदरतेचा कळस 👫

इंद्रधनुचे सातही रंग तुला बघून लाजावेत
इतकी सुंदर आहेस तू

निखळत्या पाण्यातील प्रतिबिंबालाही तुझाच मोह जडावा
इतकी सुंदर आहेस तू

माझ्या कवितेतील परीने देखील तुझ्यावरच कविता करावी
इतकी सुंदर आहेस तू

सुंदरतेच्या कळसावरही तुझेच नाव कोरावे
इतकी सुंदर आहेस तू

धरतीची तहान भागवन्याच्या हेतूने पडणारा पाऊसही तुझा स्पर्श होता प्रेम कविता करू पाहे
इतकी सुंदर आहेस तू

मकरंदाच्या शोधार्थ निघालेला फुलपाखरूही तुला पाहताच दिशा बदलावा
इतकी सुंदर आहेस तू

तुझी सुंदरता मी काय वर्णू
तुझे अस्तित्व उमगताच देवही भूतली येण्याचा हट्ट धरू पाहे
इतकी सुंदर आहेस तू

     कल्पेश पाटील
    9594764745
          पनवेल

Ganesh Appa Awaghade


Krushna R Jagtap Deshmukh


Atul Kaviraje

    कल्पेश सर, आपल्या " सुंदरतेचा कळस ", या कवितेने तर चक्क आपल्या मनाच्या " सुंदरतेचा कळस " गाठल्याचे स्पष्ट दिसत आहे, इतकी सुंदर कविता आपल्या लेखणीतून कागदावर उतरली आहे. ती इतकी वरवर, टोकाला गेली आहे, कि प्रत्यक्ष स्वर्गातील परमेश्वरही तिज धर्तीवर उतरून दाद देईल कि काय असे वाटू लागले आहे.

     इंद्रधनुचे सप्तरंग, निखळ जलाचे प्रतिबिंब, सौंदर्यवती नाजूक परी, पर्जन्य-परीस-जल, मधू -साठा शोधण्या विहरणारे फुलपाखरू, हि सौंदर्याची जितकी विशेषणे आहेत, जी सुंदरतेची परिसीमा गाठत आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटींनी सुंदर असलेल्या अश्या आपल्या प्रेमिकेच्या सुंदरतेचे भावोत्कट वर्णन कवितेतील प्रेमी, मनापासून करीत आहे.

     अतिशय उच्च प्रतीची हि कविता वाचून मन प्रसन्न नाही झाले तरच नवल. आपल्या सुंदर मनातून सुचलेल्या, सुंदर हस्ते,सुंदर लेखणीतून लिहिलेल्या  अनेक सुंदर कविता,  नितळ, निर्मल कागदावर यापुढेही अश्याच उतरोत, हीच आपणास माझ्याकडून मनीची सदिच्छा.

     सौंदर्य फक्त रूपातच नसत
     हे आज मला कळलंय
     त्यापाठी एक सुंदर मनही असत
     हे आज प्रकर्षाने जाणवलंय.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-३०.०५.२०२१-रविवार.