आई मला एक बाहुली आणशील का.

Started by Dnyaneshwar Musale, May 20, 2016, 08:10:45 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आई मला एक बाहुली आणशील का
तिला चढवेल मी मखमलिची चादर
न्हाण धुणं करून ठेवील आदर
तिचे चमचमणारे डोळे
नजर माझी रोखतील,
चोरून लपुन ते ही
मला बघतील
बोलता नसलं येत
तरी बोलुन मला दाखवतील,
तु घरात नसली तर
तीच माझी काळजी घेईल
तु नाही म्हणुन
कुशीत तिच्या झोपी जाईल,
कधी माझ्या पुढं
कधी जवळ राहील
झोपुन उठल्यावर
रडु नाय म्हणुन
ती वाट माझी पाहील,
लपंडावाचा खेळ
मी तिच्याशी खेळेल
पळता येत नसलं
तरी मी तिच्या
सोबतीने पळेल,
हसवणार मला
माझ्यासारखं कुणीतरी मिळेल,
जरी आई मी आहे
तुझं छोटसं बाळ
पण मलाही हवं
आहे माझ्यासारखंच बाळ.
जुळलेल नातं आई
तुही बघशील,
खेळताना मला
पाहुन नवीन एक
बाहुली देशील.