ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 20, 2016, 10:05:49 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

मला कळते तसे पावसाळा दरवर्षी कमीकमी होतांना दिसतो. मला आठवते आमच्या गावातील नदीला वर्षभर पाणी असायचे पण आज प्यायच्या पाण्याची चिंता सतावत आहे. अन ही चिंता ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. यावर्षी दुष्काळाने अगदी काळजावर घाव केला आहे. याच विषयावर जरा वेगळी रचणा म्हणून काही वर्षापूर्वीचा काळ रचणेतुंन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

रचणाकार,
ललित कुमार,,,,
wapp7744881103

आजा कायम सांगत असे
मला गोष्ट नदी नाल्याची,!
त्या काळ्या सुंदर ढगातुन
मिळणाऱ्या शुभ्र मोत्यांची,!

मुसळधार धारेत अंगनात
जन्म घेणाऱ्या ओढ्याची,!
लाटेमध्ये कसरत करत्या,
नाजूक लढाऊ होड्यांची,!

पावसामध्ये खेळतांना पाहून
आईच्या रागवलेल्या हाकेची ,!
बाबांना पाहून पळत सुटत्या
चिखलात रमल्या त्या मनाची,!

शाळेत जाताना रस्ता सोडून 
तुडवलेल्या चिखल पाण्याची,!
कपडे खराब, पुस्तके ओली
म्हणून मिळालेल्या छड्यांची,!

सुट्टीच्या दिवशी सदऱ्यात
पकडल्या सोनेरी माश्याची,!
काचेच्या बरणीत ठेऊन तो
मोठा कसा करायचा चिंतेची,!

नदी काठी चिखल करून
किल्ला बांधाणाऱ्या हातांची,!
वाळूमधील शोध मोहिमेत
मिळालेल्या शंखशिपल्याची,!

आजा माझा सांगत असे
गोष्ट सत्य ती भूतकाळाची,!
आता दरवर्षी पाऊस कमी
चिंता करा भविष्यकाळाची,!

लल्या म्हणे उठा जागे व्हा,,
झाडे लावा झाडे जगवा,,
पाणी आडवा पाणी जिरवा,,
निसर्ग फुलवा जीवण घडवा,!

(सुचणा- विचारल्याशिवाय पुढे पाठवू नये अन पाठवली तर नाव खोडू नये)