रोज तूझ्या केसांमध्ये...

Started by Kunal bhoir, May 21, 2016, 11:48:05 AM

Previous topic - Next topic

Kunal bhoir

रोज तूझ्या केसांमध्ये
वाय्रा परी खेळतो मी.
मखमली या गालांना
स्पर्शानेच कळतो मी.
पाणीदार डोळ्यांमध्ये
तासंतास बूडतो मी
डोळ्यांनतर आपसूकच
ओठांपाशी वळतो मी.

ओठांपाशी थांबायला
कारण फक्त हवं असतं.
स्पर्शा सारखा स्पर्श तोच
Feeling तेवढ नवं असतं

वेळ अशी त्याच जागी
मुद्दामच थांबून राहते.
तुझ्या नी माझ्या श्वासांना
एकमेकांत बांधून राहते.

डोळे मिटून दोघांचाही
होई चालू स्वप्नांचा खेळ.
अशीच तू माझ्या मिठीत
आणि निघून जाऊदेत वेळ.

घट्ट मिटून डोळे दोन्ही
आणखीन माझ्या मिठीत शिरतेस.
ओठांवरती नाही तरीही
गुपचूप तूही माझ्यावर प्रेम करतेस.

- डॉ. कुणाल