प्रेम...........एक सुंदर भावना - part 1

Started by dip.21484, May 21, 2016, 04:22:43 PM

Previous topic - Next topic

dip.21484

दीर्घ आजाराने तिचे बाबा तिला अणि तिच्या घरच्यांना सोडून निघून गेले. सम्पूर्ण घर जणू खचून गेले. आकस्मिक ओढवलेल्या ह्या दुखातून घराला सावरण्याची जबाबदारी तिच्यावर होती. बाबा जाण्याच  दुःख तिला ही होत, पण ते कुरवाळत न बसता ती पुन्हा उभी राहिली ते तीच घर, तिची आई आणि तिची दोन लहान भावंड यांना सावरण्यासाठी. पुढच्या ३ महिन्यातच तिने जॉब करायला सुरुवात केली.  तिने खुप कष्ट केले, खुप महेनत केली आणि घराला बऱ्यापैकी सावरल. सगळ चांगल चालू होत.

ती ज्या ठिकाणी जॉब ला होती तिथेच एक मुलगा होता same department ला  . ती त्याची मदतनीस म्हणून कम करत असे. अचानक त्याची दुसऱ्या शहरात बदली झाली. कधी कधी कामासाठी त्यांच फोनवर बोलण होत असे. तर कधी कधी SMS मधून बोलन होई. आता तर त्याचे तिला रोजच SMS येऊ लागले. तो दिवसभर घडलेल्या सगल्या गोष्टी तिच्याशी share करू लागला. त्याच्या घरगुती गोष्टी ही तिला सांगू लागला. ती ही त्याच म्हणण अगदी मैत्रिणी प्रमाणे ऐकून घेई लागली अणि त्याचे प्रोब्लेम्स सोल्व करण्याचा प्रयत्न करी. कधी कधी चाटिंग through ही त्यांच बोलन होई. तर कधी अगदी रात्रि १-२ वाजे पर्यंत त्याने SMS वर बोलण चालू असे.

एकदा त्यांच्या कंपनी ने एक ट्रेनिंग organize केल अणि त्या साठी एतारान्बरोबर ह्या दोघांची ही निवड करण्यात आली. ट्रेनिंग मुंबई पासून खुप दूर एका रेसोर्ट वर होत. तो ही ट्रेनिंग attend करण्यासाठी आला. १ रात्र २ दिवस असा कालावधि होता ट्रेनिंग चा. ट्रेनिंग संपल्यावर परतीच्या प्रवासात नेहमी प्रमाणे गाण्याच्या भेंड्या रंगल्या. त्याचा आवाज खुप छान असल्याने त्याला सगळ्यांनीच गाण्याचा आग्रह केला. त्याने एक भजन गायल. अर्थ नहीं कळला शब्दांचा कारण ते त्याने त्याच्या मातृभाषेत मधे गायलं होत. पण त्याचा आवाज नेहमी सारखा नहीं लागला आज, ऐकताना हे तिला जाणवलं . त्याच दिवशी रात्रीच्या ट्रेन ने तो परत जाणार होता चेन्नई ला. त्याने जाण्यापुर्वी सगळ्यांचा निरोप घेतला अणि तो तिच्यापाशी आला. तिला म्हणाला. '' Bye.......forever ......'' तिने ही त्याला Bye केल आणि तो निघून गेला.