प्रेम...........एक सुंदर भावना - part 3

Started by dip.21484, May 21, 2016, 04:30:51 PM

Previous topic - Next topic

dip.21484


सगळ खूप छान चाललं होत .........  पण तरीही एका गोष्टीची सतत भिती असायची त्यांना......... ती दोघ कधीच लग्न नाही करू शकत एकमेकांशी. ते कधीच एकत्र नाही येऊ शकत आणि याला कारण होत त्यांच्यातील जातीच अंतर......... त्याला ठाऊक होत कि त्याच्या घराचे त्याच्या ह्या प्रेमाचा कधीच स्वीकार नाही करणार, ते कधीच त्यांच्या जाती बाहेरची मुलगी सून म्हणून नाही स्वीकारणार ......... तिच्या बाबतीत थोडस उलट होत ......... तिला स्वतासाठी स्वार्थी विचार करून घराच्या जबाबदाऱ्या अशा अर्धवट सोडून लग्न नव्हत करायचं ......... तिच्या घरच्यांना गरज होती तिची ......... तीच घर हे top most priority होत तिचि.


ह्या बाबतीत दोघांचही एकमेकांशी बोलण झाल ......... दोघांनीही ठरवलं कि आई वडिलांच्या आणि घरच्यांच्या परवानगी शिवाय आपण नाही लग्न करायच.


त्याने त्याच्या घरी दोघांबद्दल सांगितलं, त्याच्या घरातून तीव्र नकार आला. हे अपेक्षितच होत. तिने घरी विचारण्याचा प्रश्नच नव्हता कारण तिला अस वाटत होत कि तिने घरी विचारण स्वार्थीपणा च ठरेल.


तिने त्याला सांगितलं कि ती त्याच्या शिवाय दुसर कुणाशी हि लग्न नाही करणार. तिने त्याला हे हि सांगितलं कि ''तू तुझ्या आई बाबांना माझ्यासाठी दुखाऊ नकोस. तू त्याचं ऐक. मी समजावेन स्वताला.'' तो खूप हळवा झाला होता खूप कठीण होत तिच्यासाठी हे सगळ सांगण पण हे करणं भाग होत.


तरी हि तो ऐकेनाच तिच. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरेच दिवस गेले अन अचानक त्याचे calls येण, SMS येण बंद झाल. तिने खूप वाट पहिली त्याची पण त्याचा ना call ना SMS. मग तिनेच त्याला call केला पण त्याने उचललाच नाही, SMS केला पण त्याचा हि काही reply नाही. तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. ती खूप घाबरली पण त्याच्या विषयी काहीच कळत नव्हत ......... असेच २-३ महिने गेले आणि एक दिवस त्याचा SMS आला त्यात त्यानं लिहिलं होत ''whatever I did is for your safety only''. तिला हायस वाटलं, तिची खात्री पटली कि तो जिथे कुठे आहे तिथे ठीक आहे. त्याच्या ह्या SMS चा अर्थ मात्र तिला चांगलाच कळून चुकला होता.


तिने ठरवलं कि आता त्याला परत नाही disturb करायचं. ती खूप रडत होती, तिच्या मनात विचारांचं काहूर माजल होत ''तुला सगळ माहित असताना का प्रेमात पडलीस त्याच्या? का त्याला जायला सांगितलस? का नाही थांबवलस त्याला? का? ''का त्याने अजून थोडी हिम्मत दाखवली नाही? का त्याने कच खाल्ली? का सांगितलं त्याने मला कि तो प्रेम करतो माझ्यावर? हेच प्रेम होत का त्याचं? अशा अनेक प्रश्नांच वादळ उथळ होत तिच्या मनात. संपल होत सगळ. 


ती खचली होती पण तरीही तिने पुन्हा एकदा स्वताला सावरलं......... पण ती अजूनही त्यातून पूर्णपणे बाहेर आलेली नाही.


आता तर तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे ......... खूप सुंदर, त्याला साजेशी अशी बायको आहे त्याची......... गोड मुलगा आहे त्यांना ......... छानसा सुखी संसार आहे त्या दोघांचा आता ......... ''ती'' कुठेच नाहीये त्याच्या आयुष्यात आता.........   


पण ......... तिचं आयुष्य मात्र तिथेच गोठल आहे ......... ती अजूनही त्याच वळणावर उभी आहे जिथे ''तो'' तिला सोडून गेला होता ......... तिला त्याची आठवण येते अस नाही म्हणणार कारण ती त्याला विसरूच शकलेली नाही ......... ती आजही एकटीच आहे......... आजूबाजूला खुप माणस आहेत ......... तरीही ती एकाकीच आहे.
[/font]


तिचं आजही त्याच्यावर तितकच प्रेम आहे .........''प्रेम'' हि जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे हे त्याच्यामुळेच तर कळल तिला .........  त्याच्या सोबत, त्याच्या प्रेमात घालवलेला प्रत्येक क्षण पुरेसा आहे तिच्या जगण्यासाठी .........त्याने खूप सुंदर क्षण दिलेत तिला ......... 


त्याच्या विषयी तिची काहीच तक्रार नाहीये ......... पण हे जग सोडून जाण्याआधी त्याची एकदा तरी भेट व्हावी हि एकच इच्छा आहे तिची ......... त्याचा च चेहेरा डोळ्यात साठवून अखेरचा श्वास घ्यायचा आहे तिला .........
[/font]