मधुचंद्र

Started by श्री. प्रकाश साळवी, May 21, 2016, 05:47:58 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मधुचंद्र
एकाच मंचकी दोघे आपण
पायी पैंजण वाजे रूण झुण
प्रणयास होते दोघे आतुर
मनास वाटे थोडी हुरहुर
आरंभ प्रणयास कसा करावा?
चुंबनाचा जरी वर्षाव करावा
अखेर आले समीप दोघे
थरथरले जरी शरीर अवघे
ओठास ओठ अलगद बिलगले
एकास एक मग मिठीस भूलले
नको नको वसनांचा अडसर
एकेक करूनी सारीले दूरवर
मन मनात मिसळले
तन तनास मिसळू लागले
वाटे व्हावे एकच तन-मन
अन् साधला "समाधी" चा क्षण
अविस्मरणिय ही रात्र मिलनाची
अशी कहाणी मधुचंद्राची

प्रकाश साळवी