प्रेम का करू नये

Started by anilkulthe, May 21, 2016, 09:27:22 PM

Previous topic - Next topic

anilkulthe

डोंगर दर्‍यामधून वहनार्‍या नाजूक झर्‍यासारखे
तुझ्या नाजूक सौंदर्यावर प्रेम का करू नये

वार्‍याची झुळुक आल्यावर अलगद तुझ्या डोळ्यावर
येणार्‍या केसांच्या बटांवर प्रेम का करू नये

पैंजणाच्या घुंगूरच्या आवाजाने तू येण्याची चाहूल लागणार्‍या
त्या पैंजनावार प्रेम का करू नये

पाउस पडून गेल्यावर निसर्ग जसा हसतांना दिसतो
अशा तुझ्या मोहक हसण्यावर प्रेम का करू नये

समुद्राची लाट जणू किनार्‍याला लाजून जशी माघारी जाते
अशा तुझ्या लाजन्यावर प्रेम का करू नये

तरीही तू विचारतेस माझ्यावर प्रेम का करतोस


                   - अनिल कूलथे