सोबत चालताना...

Started by गणेश म. तायडे, May 22, 2016, 08:44:01 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सोबत चालताना
मनातील बोलताना
मन होई अधिर
डोळ्यात तुझ्या पहाताना
हाताला हात
अलगद स्पर्शताना
मन बावरे होई
शहारे अंगी उठताना
सवाल कुठला ना मनी
तुझ्यासंगे चालताना
साथ हवा आयुष्याचा
तुझ्यासंगे जगताना
हसणे ओठांवरचे
गुलाबापरी फुलताना
सुटती कोडे आयुष्याची
तुझ्या मिठीत असताना

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com

anilkulthe