किल्ला

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 22, 2016, 04:28:28 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

                                                           किल्ला
किल्ला हा आपल्या महाराष्ट्राची शान, पण आताच्या काळात किल्ला म्हणजे,प्रेमी जोडप्यांना भेटण्याचे सर्वात सुरक्षित ठिकाण बनले आहे.
त्याचे कारण ही तसेच आहे. आपल्या महाराष्ट्रची शान आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले, त्यांनी मराठा साम्राज्याच्या
उद्धरासाठी हे किल्ले बांधले. पण जसे आता मुंबई मध्ये जसे मराठी माणसाचे स्थान आहे,तसे आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची अवस्था झाली आहे.
म्हणजे मुंबई मध्ये मराठी माणूस कसा फक्त नावासाठी आहेत तसेच आपले किल्ले उभे आहेत म्हणून आहेत.
    एकेका किल्ल्याला किती मोठा इतिहास आहे,सध्या याची कुणाला जानच नाही राहिली. सध्या त्या किल्ल्यांवर प्रेमी जोडप्यांचे राज्य चालले आहे.
नाही खरी गोष्ट आहे बघाना तुम्ही आताच्या काळात आपल्या महाराष्ट्राचा कोणताही किल्ला घ्या, त्या किल्ल्यावर एकतर तुम्हाला प्रेमी जोडप्यांची पंगत बसलेली दिसेल किंवा किल्ल्याच्या मोठमोठ्या बलाढ्य अशा भिंतींवर प्रेमी जोडप्यांनी त्यांचा नावाची कलाकृती केलेली दिसेल.
खरच किती पुढे चाललाय महाराष्ट्र माझा.
    अरे ज्या राज्या मुळे तुम्ही आज आरामात जगतात त्यांच्या ऐतिहासिक वास्तूवर असा लाजिरवाणा कृत्य करताना लाज वाटत नाही का?
महाराज बघत असतील तर काय म्हणतील? की ज्या वास्तु वर शूर मराठ्यांचे सळसळते  रक्त सांडले आहे, जिथे शूर वीरांनी हसत हसत
आपले प्राण धिले आणि ते केवळ याच्यासाठी की तुम्ही शांततेणी जगू शकाल, पण तुम्ही काय करताय मूर्खतेचा कळस असल्या सारखे
किल्ल्यावर कचरा करताय, शरम नसल्या सारखे कोणाचाही विचार नकरता अश्लिलतेणे प्रेम व्यक्त करताय शी.
शाब्बास लेकहो नाव काढलत तुम्ही महाराष्ट्राच. आणि तोंड वर करून विचारताय "कुठे न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?" हक्क नाही तुम्हाला
हे विचारण्याचा हक्क नाही तुम्हाला तुमच्या पापी तोंडातून महाराजांचं नाव घेण्याचा.
शेवटी आपल्या महाराष्ट्रची संस्कृती आणि आपले किल्ले आपणच जपले पाहिजेत.

बुद्धाभूषण गंगावणे.
7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com