मी मलाच समजतोय!!

Started by Khagendra, May 22, 2016, 06:38:09 PM

Previous topic - Next topic

Khagendra

मी मलाच समजतोय !!!!!
अपेक्षांच्या उन्हात संधीची सावली
शोधतोय ,
आज एवढा मोठा झालोय की मी मलाच समजतोय...
ज्ञानाची पणती घेऊन प्रयत्नांचे तेल करतोय,
पण प्रकाशाच आणि माझ्या नशिबाच राव काही जमत
नाही
विखुरलेल्या वाटांमध्ये नेमकी वाट काही मिळत
नाही
तेल मात्र संपतय पण डोळे मात्र दिपत नाही....
हजार लोक हजार मत काही खरे काही खोटे
तुकोबांच लहानपण देगा देवा आज खरच हवहवस वाटतय,
लहानच बर होतो, या वेळेच्या फटकाराणे झालोय मोठे
आज एवढा मोठा झालोय , की मी मलाच समजतोय....
तरी आटापिटा काही थांबत नाही, आणि
थांबायलाही नकोय,
कारण शब्द दिलाय त्या आतुर डोळ्यांना की मी मोठा
होणार,
त्यांनाही आयुष्यात समाधान लाभूदे, त्यांचाही
अपेक्ष्यांचा बांध फुटतोय,
आज एवढा मोठा झालोय की मी मलाच समजतोय.....
आयुष्यातील प्रश्न चिन्ह मोठ होत, प्रत्येकाचा तोड शोधतोय,
माझ आयुष्य संपलय लहानपणात, आता दुसर्यांसाठी जगतोय,
आजकाल देवळाच्या फेऱ्या जास्त झाल्यात, नशीब
नाही शक्ती मागतोय,
अपेक्ष्यांच्या उन्हात संधीची सावली
शोधतोय,
आज एवढा मोठा झालोय की मी मलाच समजतोय....