एकदा एका मुलीसाठी..

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 23, 2016, 09:23:05 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

एकदा एका मुलीसाठी..
एकदा एका मुलीसाठी
मनात प्रेम दडल होत,
वाटत नाही मला कधी
तिला हे कळले होते.
चार-पाच बस सोडल्या
तिच्यासाठी बसच्या रांगेत,
ती व्यस्त होती मोबाइल मध्ये
तिला हे कोण सांगेन.
लक्षात ठेवून वाढदिवस तिचा
सगळ्यात पहिलं केल तिला विश,
म्हंटली आजच्या दिवशी
करते मी कोणाला तरी मिस.
तिची वाट बघताना
वेळ समजत नसायची,
घरच्यांचा फोन आल्यावर
कळायच रात्र झाली असायची,
तिला बघितलतर ती
नेहमी फोनवरच असायची.
एकदा सांगितलं तिला
प्रेम आहे माझ तुझ्यावर,
ती म्हणाली असं काय आहे
तुझ्यात की मी प्रेम करू तुझ्यावर.
खरतर तिला हे सांगण्यात माझ
खूप मोठं धाडस होत,
एकदा एका मुलीसाठी
मनात प्रेम दडल होत.


कवि : बुद्धाभूषण गंगावणे.
7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com