प्रेमाची श्रीमंती

Started by sneha31, May 25, 2016, 07:56:38 PM

Previous topic - Next topic

sneha31

ती बोलता बोलता..... बोलून गेली
लग्न करशील का?
मन सुद्धा हसतच बोलले,
या तुझ्या झोपडीत तिला आनंद मिळेल का?

तिच्या नजरेत पाहत  असतांना
आोठांनी कधी नाही म्हंटले
हे मला ही नाही कळले
प्रेम तर माझे ही खुप असतांना
पाऊले मागे वळले...

तिचा पडलेला चेहरा पाहून
मन ही थोडे गहीवरले
माझ्या नकळत तिने डोळ्यातल्या
अश्रुंना थोडे सावरले

जात, समाज, रीतिरिवाज, बंधने
आडवे येतील ही काही
पण माझ्या भातुकलीच्या खेळात
ती लवकर रमणार नाही

माझ्या घरातल्या खिडक्यांमधून
येणारी हवा तिला बेधुंद करेल ही
पण माझ्या प्रेमा खातीर मन तीच
एसी शिवाय राहील का?

तिची पाऊले माझ्यासोबत चालायला
तयार होतील ही,
पण महागड्या गाड्यातून फिरणारी ती
आयुष्यभर या पावलांची सोबती बनतील का?

कस सांगू तिला की
मी नाही ठेवू शकत आनंदी
आणि तिच्या शिवाय मी
जगू शकत नाही स्वछंदी...

कवी
रवी पाडेकर (मुंबई)
स्नेहा माटुरकर (नागपुर)