कसले कारण मागतेस.

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 26, 2016, 07:17:44 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

कसले कारण मागतेस.
कसले कारण मागतेस
तुझ्यावर प्रेम करण्याचे,
कसले कारण मागतेस
तुझ्यावर मरण्याचे.

तू आशा आहेस माझी
तू प्रेरणा आहेस माझी,
माझ्या जीवनाचा ध्यास
माझ्या जगण्याची आस आहेस तू.

तू आहेस श्वास
श्वास घेण्यासाठी कारण मागतेस,
तू आहेस प्राण
जगण्यासाठी कारण मागतेस.

माझ्या जीवनाचा आरंभ
माझ्या जीवनाचा शेवट आहेस तू,
माझ्या जगण्याचे कारण आहेस तू
माझ्या अस्तित्वाचे कारण मागतेस.

अगं नेहमी का विसरतेस
तू माझ्या हृदयाची धडधड,
माझ्या आठवणीचा उगम तुझ्यापासुन
तुझ्या आठवणीत रमायचे
कसले कारण मागतेस.

अगं वेडे खर सांग
तू पण माझ्या विचारात
रात्र -रात्र जागतेस,
मग वेडाबाई तुझ्यावर प्रेम करण्याचे
कसले कारण मागतेस....

कवि : बुद्धभूषण गंगावणे .
7738628059
gangawanebuddhabhushan@gmail.com