विरह

Started by श्री. प्रकाश साळवी, May 29, 2016, 12:44:06 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

विरह
✿❀☀
त्या लाघवी क्षणांना तू विसरून जा
गुंफल्या नात्याची वीण तू ऊसवून जा
होतो दिवाणा मी तुझ्या मोग-याचा
त्या कळ्यांचे श्वास तू घेऊन जा
का बांधले तू वचनात माझ्या क्षणांना?
त्या वचनांच्या श्रृंखला तू तोडून जा
प्रितीचे स्वप्न होते तूच तू पाहिलेले
स्वप्नात रंगताना रंग तू ऊधळून जा
पाहिल्यास का माझ्या मनिच्या वेदना ?
रक्ताळलेल्या वेदनांचे चांदणे शिंपून जा
कुठे साठऊ मी माझ्याच आसवांना
वाहत्या आसवांचे पूर तू थांबऊन जा
प्रेम माझे इतके का कलंकित आहे?
जमल्यास माझे नशिब तू बदलून जा
जातेस तू तर मग जा खुशाल सुखाने
हृदयात माझ्या एक जखम कोरून जा

♚प्रकाश साळवी ✍