जगणं झालंय मोबाईलच्या तालावर

Started by Dnyaneshwar Musale, May 29, 2016, 04:08:08 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

लक्ष मोबईलच्या क्रिनवर
नजर msg च्या सिनवर
बोटं धावतात रणांगणावर
त्या msg मधल्या मनावर
हास्य उमलत गालावर
जगणं झालाय मोबाईलच्या तालावर

सापशिडीची बनवला  security Gard
Gallery साठी स्पेशल ward
online मैत्री बनते मोठी
उमजत नाही आहे खरी की खोटी
तोंडात असला जरी बर्गर
जवळ हवा  चार्जर
उत्कंठा वाढते msg आल्यावर
जगणं झालंय मोबाईलच्या तालावर

तु कशी मी कसा
यात विसरला शेजारी
मोबाईल हातात
गनगण फिरतोय
जणु काय पडलय आजारी
वाढतो ताप कोणाकडं मोबाईल  गेल्यावर
जगणं झालंय मोबाईलच्या तालावर

कोणी होतो पुढारी बनवतो गृप
गावभर पोरांनी मिळतं भलतच रूप
msg पाठवण्याचा भलताच  ध्यास
वेळच नाही कधी करायचा अभ्यास
कधी कधी बंद असुद्या फेसबुक
दप्तर म्हणजे नको रफबुक
वापरावा mob चांगल्या कामावर
जगणं झालंय मोबाईलच्या तालावर

Messaging मध्ये कटते अर्धी रात्र
गोष्टीतली वाटतात खरी पात्र
खरतरं मिडीयाचा वापर चांगला व्हावा
त्यातुनच शिकावं एक धडा नवा
मोबाईलनी व्हावं ज्ञानाचं सिंचन
नेटवर्क नसलं तरी मग कसलं टेंन्शन
मोबाईल इतका वेळ द्यावा प्रेमाच्या नात्यांवर
दाटेल हसु त्यांच्या गालावर
पण खरचं
जगणं झालाय मोबाईलच्या तालावर.

Pankaj Ramrao sakhare


मिलिंद कुंभारे

मोबाईल इतका वेळ द्यावा प्रेमाच्या नात्यांवर
दाटेल हसु त्यांच्या गालावर....

क्या बात ....मस्तच... :) :) :)