प्रेमाचे मुकेपण

Started by ashok more, May 30, 2016, 01:48:29 PM

Previous topic - Next topic

ashok more

प्रेमाचे मुकेपण

समोरून जाताना नेहमी
हसतच निघून ती जाते
जाता जाता एकदातरी
पाठमोरी बघून ती जाते

तिचंही असावं प्रेम मजवरी
तिलाही सांगावयाच वाटत असेल
कुणीतरी बघेल कुणीतरी चीडवेल
कि लाजेने ती सांगत नसेल

सागरापरी खोलवर रुतलेले
तिच्यावरचे प्रेम मनात घोळत आहे
शब्द अनेक ओघळतात मनी
ओठावर येता येता विरघळत आहे

प्रेम आहे माझे तुजवरी
तिला एकदातरी सांगायचे आहे
मनात भरल्या भावना दाट
पण त्या  मूक धरून आहे

शब्द फुलतात मनात प्रेमाचे
ओठांवर खुलावयाचे आहे
प्रेम आहे तुजवरी सांगाया
एकदातरी तिला भेटायचे आहे


                                   अशोक मोरे