II रात्रीला पंख फुटले II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:14:10 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

रात्रीला पंख फुटले

अन ती गेली उडून

दिवस बिचारा काम करून

गेला थकून भागून

शोधू कुठं अन जाऊ तरी कसं ?

अर्धवट नोकरी सोडून

विचार करुनी तो वेडा झाला

मग्न गेला बुडून

वैनतेयास सांगे विनवून

कामिनीस आन शोधून

खगराज तो भ्रमण करून

आला निरोप घेऊन

गरोदर आहे यामिनी

आपण तात बनलात म्हणून

हतबल होवून तो अर्धा झाला

पायाखालची जमीन गेली सरकून

अन कामाचा उडणारा बोजवारा आठवून

हात पाय गेले गळून


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C