हलकट हा सामाईक शब्द आहे

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:17:57 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

एक हलकट दुसरयास हलकट म्हणाला

दुसरा तिसऱ्याला तिसरा चौथ्याला

क्रम क्रमाने वाढतच गेला

अन शेवटचा पहिल्याला हलकट म्हणाला

तेव्हा वाचकानो सवंगड्यानो

हलकट हा सामाईक शब्द आहे

या भूवरी जिवंत आहे

हि शिवी नसून तो केवळ एक शब्द आहे

अन तो पण सा.  मा.  ई . क.

ज्याचे आहोत आपण सर्व पाइक

म्हणजेच आपण सर्व आहोत ----

समजून घ्या ह्या

अंतरीच्या सामाईक शब्दांना

ऐकताच क्षणी  दुसऱ्याकडून

दान करा ते तिसऱ्याला

क्रम असाच वाढवत न्या

भेटेपर्यंत त्या पहिल्याला

तात्पर्य काय ते

सामाईक शब्द आपले नसून

असती परक्याचे धन

लेकी प्रमाणं वाढवा त्यांना

तळहातावरील फोडाप्रमाण जपा

अन मग दान करून

त्या देनाऱ्यास चोप  चोप चोपा

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C