वाचकांच्या आशीर्वादासाठी अन प्रेमासाठी

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:29:31 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

या वेड्याला

न कुणाचा लोभ , ना कसला राग

नको इस्टेट  नकोय कसला वाद

हवाय तो फक्त आणि फक्त

वाचकांचा आशीर्वाद

भावनांच काय ते

त्या तर येतचं असतात

काही उमटतात पत्रावर

तर काही

पंचतत्त्वात विलीन होत असतात

या मनातील लाव्हास  जर मिळेल

आपुल्या प्रेमाचे इंधन

शब्दांचा वणवा  मग भडकेल असा काही

न असेल त्याला कुठलेच बंधन

पर्वणीची  त्या वाट  पाही

सरस्वती ती उभीच राही

चारी दिशा बघत राही

साद तरी येत नाही

साद तुम्ही द्याल तर

पेटून उठेन मी

अन नाही दिलीत साद तर

आतल्या आत संपेन मी


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C