II निर्भयास श्रद्धांजली II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:34:51 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

वाट  अंधाराची होती

सोबत मित्राची होती

ललना उभी होती

वाट  पाहत वाहनाची

विचार अनेक मनात

संशय बळावी अंधारात

इकडे तिकडे पाहि

काय असे पदरात

वेळ पुढे जात राही

वाहन काही येत नाही

घरी जाऊ कसे ?

काहीच सुचत नाही

दूरवर दोन दिवे दिसतात

आतल्या आंत जाग्या होतात

भावना त्या मनातल्या

दिवे ते वाहनाचेच असतात

रस्ता शोधायला

वाहन जवळ येते

ललना चढते हात धरुनी मित्राचा

बघते अन घाबरते

इथे केवळ इन मीन चार माथे

वाहन सुरु होते अन मग

सुरु होते एक पाशवी प्रवास

ललना धास्तावते

जवळ येता दोघांसी बघून

मित्र बळ एकवटतो पण

कमी पडतो एकटा म्हणून

फेकुनी त्यास बाहेर

त्या निर्जन स्थळी

हाणली अबलेच्या माथी

एक पोलादी सळी

त्या निबिड अंधारी

क्रौर्य वाढे असुरी

नराधमांनी इतके लचके तोडले

कि क्रौर्यहि त्यापुढे ओशाळले

निर्जीव निपचित ती ललना

करी नाना क्षमा याचना

न कळवळा ना कसला ताप

त्या माजुरी असुरी चौघांना

देह्भुक भागता, समजुनी केर

फेकून दिले ललनेस बाहेर

पोलिस , पत्रकार , जनतेस

न्यायदेवतेस मिळे

जणू कायद्याचा आहेर

निर्भया शोषानोक्त अर्धी जाहली

त्यातच तिने मान टाकली

खडबडून जाग येई

मग जगाला

बने मत सारे

कायदा असावा लढायला


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

vrushalisohamanshumaan


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C