II मनातलं गाणं "ज्ञाना ठेवु कुठं मना" II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:44:36 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ज्ञाना ठेवु कुठं मना

तुचं तुचं दावणा

मनं अगाध अगाध

कुठं शोधून मिळणा

ज्ञाना ठेवु कुठं मना

तुचं तुचं दावणा  II१II

ज्ञाना पुण्याची गणना

तुचं तुचं दावणा

वाटे अंधार माखला

दिवा शोधून मिळं  ना

ज्ञाना पुण्याची गणना

तुचं तुचं दावणा II२II

ज्ञाना पापाची रचना

तुचं तुचं मोडणा

पाप तनात मनात

देई नाना यातना

ज्ञाना पापाची रचना

तुचं तुचं मोडणा II३II

झालं झालं रं कवनं

आता राहिलं मागणं

ज्ञाना मोक्षाची रं गती

तुचं तुचं दावणा

ज्ञाना ठेवु कुठं मना

तुचं तुचं दावणा II४II

II ज्ञानेश्वर माउलीचा विजय असो II



सिद्धेश्वर विलास पाटणकर C


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

uttam pawar

खतरनाक चौखूर उधळला आहे तुमचा साहित्य रथ . नक्कीच करंदीकर अंगात आले आहेत .

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C