II ओढ कायम अजूनही शाळेची II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:45:46 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ओढ कायम अजूनही शाळेची

अन शाळेतल्या वेड्या मायेची II

ते आम्हा सर्वांचं

स्वच्छंदी हुंडारणं अन मग

मास्तरांचं ते कणिक तीम्बवणं

त्या कणिकातून उगवणारी कणीव

आजही आहे मनात सर्व रेखीव II

न होता गाडी अन बंगला

न होता पैसा न अडका

फक्त फुलायचो मनाने

स्वच्छंदी बागडायचो

न बघायचो कसला

शेंडा न बुडखा II

कंपित होई हृदय आता

कापरे भरे त्यास

भूतकाळाची आस सदैव मजला

आठवतेय शाळा अजुनी

कामावर जाता जाता II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C