II छकुल्या , रेघोट्या असाच ओढत जा II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:49:05 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

छकुल्या , रेघोट्या असाच ओढत जा

खाडाखोड तू करत जा

जीवनही असेच आहे

पण चुकीमागे शिकत जा II

लागू नको नादी  कधी

दुसर्याना लागून दे

अन आली लहर कधी मधी

तर पोटात दोन थेंब घे II

कर्माचे चित्र जर

असले विचित्र तर

मनाचेच ऐक तू

धर्मास न दे अंतर II 

धर्म निंद्य मानला

वंद्य मग राही ते काय

धर्मासि जाण  तू

आत्म्याचे दोन पाय II

छकुल्या , रेघोट्या असाच ओढत जा

खाडाखोड तू करत जा

जीवनही असेच आहे

पण चुकीमागे शिकत जा II C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C