II ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:50:19 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या

झोळीत भावना अनेक

शब्द कुठं अन कसं पेरू

याचीच पडलीय मला मेख II

शब्द तो परतुनी येता

भावना ती तीव्र होई

शब्द तो परतुनी येता

भावना ती तीव्र होई

उतरता दौतीतुनी ते

मन मात्र शांत होई

तृप्त होता मन

जणू शब्द होई नाहीसा

भावनांनी पुन्र्जन्मायचा

घेतला आहे वसा II

शब्द जोडे भावनेला

साद मन जे घालिती

सोडावी कोडे क्षणात

भावना ज्या मांडती

शब्द वाहे भावनांना

नित्य नव्याने जन्मती

शब्द माझा सोबती , गड्या

शब्द माझा सोबती अन

शब्द ती सरस्वती II 


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


uttam pawar

डॉक्टरसाहेब अजून किती आहेत आणि सर्व अशाच आहेत का ? मी आता सुट्टी घेतो तुम्ही ती काबुल करा .

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C