हनुमानाचा मर्कट झाहला

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:56:30 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

बाईमाणसाने काय काय म्हणून शोधायचं

आणि का शोधायचं ?

अहो का ते तुम्ही शोधा

अन काय काय ते मी शोधते .

सुरु होते लगीन गाडी पहिल्या रात्रीपासनं

बिन् तिकिटाचा प्रवास भारी

शोधाशोध अन  उपसनं

इकडून तिकडे शोधत राही

दुण्ढाळी  दिशा सर्वत्र

कसा होतो अन कसा झाहलो

लग्नानंतर विचित्र

पोरेढोरे मिळूनी सारे

वाढवीत जा पुढे पसारे

क्षणाक्षणा मग कासावीस तू

बालपण बघ विसरलास तू

हनुमानाचा मर्कट झाहला

लग्नानंतर पुरता मेला

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

uttam pawar

मानल तुला आणि तुझ्या प्रतिभेला . हे फक्त तूच लिहू शकतोस शास्त्रज्ञ असून देखील हे सर्व . कमाल आहे तुझी. 

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C