II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:57:44 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II

यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II

कंगाळ बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II


अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बळीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

uttam pawar

शेतकर्यांचे यज्ञ म्हणजेच मख छान शब्दांत मांडले आहेस . पुढारी आणि त्यांचा काळाबाजार सर्वज्ञात आहे

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C