II चल बस्स झाले आता II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 09:00:14 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

चल बस्स झाले आता

दूर कुठं तरी जाऊ

अन चहा मिळतेय का ते पाहू

नको तो गोंधळ कामाचा

वीट येतो आता जिवाचा

टाइमावर या अन

स्वतःची लावून जा 

चल बस्स झाले आता

दूर कुठं तरी जाऊ

अन चहा मिळतेय का ते पाहू II

कान ऐकेनासे झाले

डोळे उघडेनासे झाले

गोत्रे थकली सारी

थकलो पुरे रे नाथा

चल बस्स झाले आता

दूर कुठं तरी जाऊ

अन चहा मिळतेय का ते पाहू II

धावाधाव कधी न संपणारी

महिन्याअखेरी रिती शिदोरी

सदानकदा असे कर्जबाजारी

धाव धाव दुखःहर्ता

चल बस्स झाले आता

दूर कुठं तरी जाऊ

अन चहा मिळतेय का ते पाहू II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C