काय तुम्हाला , परत शिवबा हवाय ?

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 09:09:24 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

काय तुम्हाला , परत शिवबा हवाय ?

तर मग बोला नमः शिवाय

करा जागर त्या रायडेश्वराचा

भरा घागर रक्ताने

रायडेश्वराच्या अभिषेकासाठी

तरच येईल तो परतुनी

तुमच्या रक्षणासाठी

जर परत शिवबा हवाय

तर मग बोला नमः शिवाय

आप्त स्वकीय रक्षणाय

दुर्जन उच्चाटनाय

बोला नमः शिवाय
बोला नमः शिवाय



सत्शील रक्षणाय

दुराचारी भक्षणाय

बोला नमः शिवाय

बोला नमः शिवाय

वेड्यांनो तो आला तेव्हाच परतलाय

नाही कुठं दूर  तो गेलाय

आपल्याच  नसनसांत भिनलाय

आला तेव्हाच तो मनात शिरलाय

आता फक्त बोला नमः नमः शिवाय

अन करा जागर भवानी मातेचा

जागं करा त्या रायडेश्वराला

उखडून टाका  त्या  पाशवी सत्तेला

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C