राखून ठेव दुधाचे थेंब तू ( गायीची शोकांतिका )

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 09:11:13 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

राखून ठेव  दुधाचे थेंब तू

मज पाडसा पाजावाया

रक्त माझे शोषलेस   

काही नाही त्यास द्यावया II

घास देई तू मजप्रती

दुध देते मी म्हणून

अर्थ नाही, व्यर्थ आहे

जीवन शिंगं असून II

कामधेनु गोमाता नावे

मज अनेक ती

भाकड पैदा होता

खाटीकास  विकती II

निचातून नीच तू

तुझ्यासम कुणी नसे

धर्माचे स्तोम करे

अंतरी आत्माच नसे II

विकशील का मुलीला ?

वांझ जर असेल ती

जरा खरचटता तिला

झोपही उडेल ती II

वळू नको भाकड नको

दुभती गाय पाहिजे

माग तू याच जन्मी

मग भोग नरकयातना II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C