अणुरेणु चराचरि

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 09:12:06 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

अणुरेणु चराचरि
दुनिया निर्माण हि सारी
मन वेगळे वेगळे
अणुरेणुहुनी भारी II

मन शोधून मिळेना
देई अनेक यातना
मनापुढे कोण चाले
मात्रा , चालेना चालेना II

मन आले रे आले रे
मन गेले रे ते गेले
मन वार्यावानी डोले
संगे मानव तो चाले II

मन रावण रावण
दहा तोंडाने जेवण
मन शाबूत  शाबूत
तोचि काबूत काबूत II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

mukund nemane

च्छान वाटली . खरंच मन दहा तोंडाने खायला बघतं . ते काबूत ठेवणं किती गरजेचं आहे ते वाचल्यावर कळतं

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C