ई साहित्याचे प्रत्येक पान

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 09:13:39 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ई साहित्याचे प्रत्येक पान

आम्हा लेखकांसी जीव कि प्राण

व्यासपीठ तू दिले आम्हासी

धन्य धन्य आम्ही सर्व प्रवासी

या नावेतच नावं ते सगळे

ई साहित्याचे असू आम्ही मावळे

उंच उंच नेऊ धुरा साहित्याची

खंत न आम्हा असे उद्याची

हृदयी पान्हा फुटतच जाई

हाती लेखणी अन पसरे शाई

या शाईतून  अंगार बरसती

साहित्याची मुळे  पसरती

खोडे पाने मुळे  लव्हाळे

ई साहित्याचे असू आम्ही मावळे

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C