एक तिची आठवण........

Started by chandrasen, May 31, 2016, 12:08:34 PM

Previous topic - Next topic

chandrasen

 
आठवत गेलो तर त्या
जुन्या आठवणी ताज्या होतात
त्या आठवणीतील सर्व रात्री
तिच्या आठवणीत माझ्या होतात

काही आठवणी आठवायच्या असतात
काही आठवणी विसरायच्या असतात
तर काही आठवणी आठवून सुद्धा
त्या विसरल्यासारख्या दाखवायच्या असतात

दुख ती गेल्याचे दाबून अंतरी
एकांतात मी रडत असतो
म्हणुनच का कोणास ठाऊक
सर्वासोबत मात्र हसत असतो

पण काहीही असले तरी
आजही तिलाच पाहायला नजर फिरत असते
सागरी किनारा दिसला की
मात्र तिचीच आठवण येते

मित्र माझे नेहमी समजावतात मला
ती होती जेव्हा तुझ्या आयुष्यात
तेव्हा रंगवत होतास स्वप्नं मनांचे
पण आता भंग पावलेत ते स्वप्नं ता-यांचे

ती आता गेलीय तुला विसरुन
हे आधी तु विसरु नकोस
आणि परत-परत तिच्या आठवणीत
लाख मोलाचे अश्रू गाळू नकोस

तिला विसरण्याचा आज ही  मी
खुप-खुप प्रयत्न करतो
पण खरं सांगतो या कविता लिहता-लिहता
मी फक्त तिलाच आठवतो......

मी फक्त आणि फक्त तिलाच आठवतो....

                                          - चंद्रसेन


nitin gaikwad

एकच नंबर कविता आहे