!!तुझ प्रतिबिंब माझ्या मनातल!!

Started by Vivek.j, May 31, 2016, 01:38:29 PM

Previous topic - Next topic

Vivek.j




स्वच्छ पाण्यात मला तुझ प्रतिबिंब नेहमी दिसत
तेव्हा तुझ चित्र रेखावट  वाटत
पण तुला रेखाटताना कुंचल्याच ही भान हरपत
सौंदर्य  तुझ उन्हात ही लखलखत
ते केवळ तुझ प्रतिबिंब असत
जे कायम माझ्या डोळ्यात सामवलेल असत
तरीही तुच आहेस अस नेहमी वाटत
तुझ्या प्रेमात मन ईतक गुरफटत
की तुझ प्रतिबिंब ही मला बोलायला लागत
जेव्हा पाणी वाहायला लागत
तेव्हा भान अचानक येत
चित्र तुझ पाण्यावर तरंगू लागत
प्रतिबिंब हळूहळू नाहीस होऊ लागत
डोळेही झाकले जाऊ  लागतात
जास्तीत जास्त तुला साठवू लागतात
स्मितहास्य आपोआप येत
मन तुझ्यातच विलीन होत
वेड्या मनाला तु नसतानाही भासतेस
निसर्गाला आपलसं करून टाकतेस
मनाच नेहमी असच  होत
तुझ्या नादान मन खुळ होत
तुझ्याच नावाचा जप करत
तुझ्या प्रेमात रोज मरत रोज जगत

                                         :- विवेक जाधव