येशिल का रे परतुनि कधी तरी........?

Started by sindu.sonwane, May 31, 2016, 01:47:05 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

 ती वाट तोच सहवास, बस तुझी सोबत दयाला
येशिल का रे परतुनि कधी तरी........?

तीच आपुलि मस्ती, तोच आपुला अल्लडपण
तीच आपुलि बेफिक्री, तीच आपुली मैत्री
पुन्हा तीच दोस्ती निभवायला

येशिल का रे परतुनि कधी तरी........?
तेच आपुले प्रेम तोच, आपुला जिव्हाळा
तेच आपल हसण, तेच आपल रडण
पुन्हा अश्रू माझे पुसायला हसू मला दयाला

येशिल का रे परतुनि कधी तरी........?

तोच आपला विश्वास, तेच आपले जग
तेच आपले भांडण, तोच आपला अबोला
हाच अबोला भंग करायला
येशिल का रे परतुनि कधी तरी........?

तेच तुझं माझ्यावरती बिघडण, तेच माझ तुला समजावून घे

तेच तुझं मला घट्ट  मिठ्ठीत घेऊन जीवापाड प्रेम करण
ह्या प्रेमाला असंच आबाद ठेवायला
येशिल का रे परतुनि कधी तरी........?

तोच माझ्या औषधांचा उग्रवास, तोच तुझ्या डोळ्यातला ओलावा
तोच माझ्या शरीरातील वेदना, तोच तुझ्या मानाचा दुःखावा
शरीरातील वेदनांना माझ्या दूर करायला अलगद मारलेली तीच तुझी सर्वांसमोरची मीट्टी
तेच शेवटच आलिंगन दयायला
येशिल का रे परतुनि कधी तरी........?
 
बस पुन्हा एकदा विचारते
येशील का रे परतुनि कधी तरी........?
या निरंतर वाहणाऱ्या अश्रूंना थांबवायला
सुखाचं नावही विसरलेल्या या मनाला सुख दयायला
आणि तुझ्याचसाठी थांबलेल्या हृदयाला धडधड्याला

येशिल का रे परतुनि कधी तरी........?

                                     सिंदु