क्षण आनंदी

Started by पल्लवी कुंभार, May 31, 2016, 03:30:15 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

आज उगवणारा सूर्यही तोच होता
आज मावळणारा चंद्रही तोच होता
मात्र बदलवणारा क्षण निराळा होता
दिवस सौभाग्याचा होता....

मिळणार नवी नाती आपुलकीची
लाभणार नवी माणसं जिव्हाळ्याची
मात्र कशी भागवणार ओढ माहेरची
घुटमळली लाडकी उंबऱ्यात ही....

मांडणार संसार ती सुखाचा
बांधणार इमला रेशीम धाग्यांचा
सोबतीला आशीर्वाद आई-वडिलांचा
स्मृती मनात जाग्या बालपणीच्या...

बहरणार सोनकिरणे सुखाची
पसरणार लहर सर्वत्र आनंदाची
उभी खंबीर दु:खाला सक्षम ती
सार्थ सहचारिणी....

टाकणार आज पाऊल नवजगी
बांधणार ती शिदोरी आठवणींची
घेणार भूमिका आता जबाबदारीची
देणार साथ नवऱ्यास जन्मोजन्मीची
चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी !!

~पल्लवी कुंभार