माझ्या मनातलं तु कधी ओळखुन बघ.

Started by Dnyaneshwar Musale, May 31, 2016, 07:56:42 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

गुलाबाचं
फुल कधी हुंगून बघ
माझ्या मनातलं
तु कधी ओळखुन बघ.

गाडी सोडुन
माझ्या सायकल वर
बसुन बघ
डोळ्यानी डोळ्याला
हसवुन बघ.

Headphone मधल्या
नादाला
विसरून  बघ
माझ्या ओबड  धोबड
गाण्यांचा  सुर धरून बघ.

तुझ्या  रद्दीतल्या
पानांना कधी
उचकून बघ
पाटीवरती माझ्या
नाव कोरून बघ.

थंडीतल्या अंधारात
नटुन बघ
सोबतीला माझ्या
आठवनींना घेऊन
शेकुन बघ.

मनमोकळं
फुलपाखरा सारखं
बाग रंगवुन बघ
कधी तरी प्रेमात
पडुन जग.


लुक लुकनाऱ्या
चांदण्याना
न्याहाळुन बघ
चंद्रमुखी तु
फुलचाफ्याला  ओवळुन बघ.

मोगऱ्याला वेणीत
एकदा माळुन बघ
दोन फुलांना
एका धाग्यात
ओवुन बघ.

हृदयाला हृदय
कधी जोडुन बघ
एकच आहे दोन हृदय
हे समजुन बघ.

पडलोय तुझ्या
प्रेमात आता
स्वीकारून बघ
माझ्या मनातलं
तु  कधी ओळखुन बघ.
Dnyaneshwar