तु निघुन गेलीस जेव्हा...

Started by Balaji lakhane, June 01, 2016, 06:36:45 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तु निघुन गेलीस जेव्हा...

जिवनाचा तोल ढासळला
जगण्याचं मोल विसरला
          तु निघुन गेलीस जेव्हा...

जीवनातला आनंद हरवला
विहराचा वर्षाव झाला
          तु निघुन गेलीस जेव्हा...

मनातल्या भावना नष्ट झाल्या
ऒठातले शब्द अबोल झाले
          तु निघुन गेलीस जेव्हा...

स्वप्नाच्या झुल्यावर झुलणारा
तो झुलाही आता तुटुनी गेला
माझ्या प्रेमाला न अर्थ काही उरला
           तु निघुन गेलीस जेव्हा...

तु खर्या प्रितीत शोध घे
मनाला काहीतरी बोध घे
आठवणी माञ इथेच सोडुन गेलीस
            तु निघुन गेलीस जेव्हा...

मरणाची घडी ही आली
मरणाची तयारी पण झाली
           तु निघुन गेलीस जेव्हा...

कवी --बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर.
What's app no 8888527304