तुला शोधण्यासाठी

Started by ashok more, June 01, 2016, 01:29:11 PM

Previous topic - Next topic

ashok more

तू दिसतेस फुलात
तू असतेस पानात
तू दिसतेस उन्हात
तू असतेस मनात
तू मेघांच्या छायेत
तू प्रेमाच्या बागेत
तू वाहत्या पाण्यात
तू डोळ्यांच्या पापण्यात
म्हणून तुला पाहण्यास
मी अधीर होत नाही
अन तुला शोधण्यासाठी
माझ्याकडे कारणच नाही