कुणीतरी आठवण काढतंय

Started by marathi, January 24, 2009, 01:08:55 AM

Previous topic - Next topic

marathi

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही"


-- -(सुप्रसिद्ध कविवर्य श्री. वैभव जोशी)

sai patil

Hi kavita konachi ahe??  Ekdam apratim ahe!! khupch mast!!!

nitin1123

ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.
"सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही