ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र

Started by siddheshwar vilas patankar, June 02, 2016, 07:21:21 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

उठ  मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र

हे विश्वची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र

शिवरायाचा पाठ गिरवावा

भ्रष्टाचार समूळ उखडावा

सैनिकांचे रक्त सांडले

पावन अपुली भूमी

या मातीतच टिळकही घडले

तर स्वातंत्र्योत्तर कृमी

नाळ आपुली पावन भूची

जा नसे तुम्हास जाण

उठ  मराठ्या आधी जागा हो

मग फिटेल सारे वाण 

बलिदानाची वेळ जाहली

पेटव साऱ्या मशाली

टाक एक तू पाऊल पुढचे

बघ पेटेल उभी ही दिल्ली

वाऱ्याचे तू रोख मोडसी

तुजसम नसे रे कोण धाडसी

अंगार जन्मतः नसनसात भिनला

का रे उगा तू रडसी

उठ  मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र

हे विश्वाची अमुचे घर असे

नसे केवल एक महाराष्ट्र
 
अंग्रेजी पिलावळ हि भारी

पिळून खाती सारी

माय माउली विकून खाती

ठेवी पुरावया माती

इतिहासाची पाने तू गिरवी

इतिहासच पुन्हा तू घडवी

या मातीचे मोल बाळगा

म्हणून म्हणतो दादा

उठ  मराठ्या जागा हो

अन पेटव सारे राष्ट्र
हे विश्वाची अमुचे घर असे

नसे केवल एक महाराष्ट्र II


कवी :: सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C